ग्रीस – ग्रीस येथील गावडोस बेटाजवळील समुद्रकिनाऱ्यावर प्रवासी बोट बुडाल्याने ५ जणांचा मृत्यू झाला, तर १२ जण बेपत्ता आहेत. ग्रीसच्या तटरक्षक दलाला ३९ जणांना वाचवण्यात यश आले.
गावडोसपासून सुमारे ४० मैलावर बोट बुडाल्याची माहिती मिळताच तटरक्षक दलाने घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत ५ जणांना प्राण गमवाला लागला. बेपत्ता असलेल्या १२ जणांचा शोधमोहिम तटरक्षक दलांच्या जवानांनी युद्धपातळीवर सुरू ठेवला आहे. या शोधमोहिमेत तटरक्षक दलाच्या चार जहाजांचा आणि दोन हेलिकॉप्टरचा समावेश आहे.
युद्ध आणि गरिबीतून कंटाळलेल्या लोकांचे ग्रीस आणि आजूबाजूच्या देशांत स्थलांतर होत आहे. ही लोक समुद्रातून बोटीने प्रवास करतात. त्यातून बोट बुडण्याची घटना घडत आहेत.
