जानेवारी 2025 मध्ये किती दिवस बंद राहणार बँका? पाहा संपूर्ण यादी

Bank Holidays in January 2025 : नववर्ष सुरू झाले आहे. सुट्ट्यांनंतर आता पुन्हा एकदा आर्थिक व्यवहार सुरू झाले आहेत. तुमच्या डोक्यात देखील जानेवारी 2025 (Bank Holidays January 2025) मध्ये आर्थिक कामे पूर्ण करण्याचा विचार असल्यास त्याआधी या महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांबाबत जाणून घ्यायला हवे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जानेवारी महिन्यातील बँका किती दिवस बंद राहतील, याची माहिती दिली आहे. जानेवारी 2025 मध्ये तब्बल 13 दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये दुसऱ्या आणि चौथ्या आठवड्यातील शनिवार व रविवारच्या सुट्टयांचाही समावेश आहे.

जानेवारी 2025 मध्ये बँका 13 दिवस बंद (Bank Holidays January 2025) राहणार असल्यातरीही प्रत्येक राज्यानुसार सुट्ट्यांमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही बँकेच्या शाखेत फोनवर सुट्टीबाबत माहिती घेऊ शकता.

जानेवारी 2025 मध्ये ‘या’ दिवशी बँका राहणार बंद (Bank Holidays January 2025)

  • 1 जानेवारी : नवीन वर्ष/ लोसांग नामसूंग- काही राज्यांमध्ये बँका बंद
  • 2 जानेवारी : लूसोंग/नामसूंग(Loosong/Namsoong)/नवीन वर्षाचा उत्सव (ठराविक राज्यांमध्ये)
  • 5 जानेवारी : रविवार
  • 6 जानेवारी : श्री गुरू गोविंद सिंग जयंती- (ठराविक ठिकाणी)
  • 11 जानेवारी : दुसरा शनिवार
  • 12 जानेवारी : रविवार
  • 14 जानेवारी : मकर संक्रांती/उत्तरायण/पोंगल/माघ बिहू/हजरत अली जयंती
  • 15 जानेवारी : तिरुवल्लुवर दिवस
  • 16 जानेवारी : उज्जावर तिरुनल (ठराविक ठिकाणी बंद)
  • 19 जानेवारी : रविवार
  • 23 जानेवारी : नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती (ठराविक ठिकाणी बंद)
  • 25 जानेवारी : चौथा शनिवार
  • 26 जानेवारी : प्रजासत्ताक दिन – सर्वत्र

प्रत्येक राज्यांमध्ये तेथील सणांनुसार बँकांच्या सुट्टयांमध्ये (Bank Holidays January 2025) बदल होऊ शकतो. तसेच, सुट्ट्या पाहूनच बँकेशी संबंधित कामे करा. बँका बंद असल्यातरीही ऑनलाइन माध्यमातून तुम्ही कामे पूर्ण करू शकता.