झोमॅटोच्या सह संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा

नवी दिल्ली – अन्न पदार्थ घरपोच करण्याची सेवा देणाऱ्या झोमॅटो या अग्रगण्य कंपनीच्या सह संस्थापक आणि मुख्य जनसंपर्क अधिकारी आकृती चोप्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.चोप्रा यांनी २७ सप्टेंबरपासून आपल्या पदाचा राजिनामा दिला,असे झोमॅटोच्या वतीने अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. चोप्रा या सुरुवातीला झोमॅटोच्या मुख्य वित्तीय अधिकारी होत्या. मागील १३ वर्षांच्या काळात त्यांनी कंपनीच्या वाढीसाठी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे.