नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेतील उद्योगपती व ट्रम्प प्रशासनातील उच्च अधिकारी एलन मस्क यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. पंतप्रधानांनीच ही माहिती समाजमाध्यमावर दिली.पंतप्रधानांनी समाजमाध्यमावर म्हटले आहे की, आम्ही दूरध्वनीवरुन दोन्ही देशांमधील विविध बाबींवर चर्चा केली. आधुनिक तंत्रज्ञान व नवोन्मेष क्षेत्रात परस्पर सहकार्यातील विविध संधींविषयी चर्चा करण्यात आली. या वर्षी वॉशिंग्टनमध्ये झालेल्या बैठकीतील अनेक मुद्द्यांना यावेळी उजाळा देण्यात आला. विविध क्षेत्रांतील परस्पर सहकार्याच्या भूमिकेचाही यावेळी पुनरुच्चार करण्यात आला.
