नवी दिल्ली – केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरील उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय आज घेतला. त्यानुसार पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात प्रति लिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.ही उत्पादन शुल्क वाढ सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या ग्राहकांकडून वसूल करणार. त्यामुळे पेट्रोल-डिझेल आणखी महागणार आहे. उत्पादन शुल्कवाढीमुळे आता पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रतिलिटर १३ रुपये, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपये इतके झाले आहे. ही शुल्कवाढ उद्यापासून लागू होणार आहे.
