रत्नागिरीत मनसे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांच्यावर हल्ला

रत्नागिरी – रत्नागिरी तालुका मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांच्यावर काल रात्री १० वाजता रत्नागिरी शहरातील गोडबोले स्टॉपनजिक हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या हल्ल्यात पक्षातीलच एका नेत्याचा हात असल्याचा आरोप रुपेश जाधव यांनी केला.

रुपेश जाधव हे आपल्या गोडबोले स्टॉप येथील कार्यालयात बसले होते. रात्री कार्यालय बंद करून ते बाहेर पडले. यावेळी मागून आलेल्या ५ जणांनी त्यांच्यावर लाठ्याकाठ्याने हल्ला केला. यावेळी रुपेश जाधव यांना ५ जणांनी बेदम मारहाण केली. जखमी अवस्थेत रुपेश जाधव यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी रत्नागिरी पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली असून हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.