राज ठाकरे आजपासून २ दिवसांसाठी विदर्भात

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे उद्यापासून दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असून आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात ते अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा भंडारा आदी जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.राज ठाकरे यांचे उद्या सकाळी अमरावती रेल्वे स्थानकावर आगमन होईल. यावेळी मनसे कार्यकर्त्यांतर्फे त्यांचे जोरदार स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर ते विविध जिल्ह्यात जाऊन तिथे मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. या दौऱ्यात विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भातील उमेदवारांची यादी घोषित करण्याची शक्यता आहे.