राज्यात शालेय शिक्षकांनाही ड्रेसकोड

मुंबई – राज्यातील शालेय शिक्षकांसाठी ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे. मालेगाव तालुक्यातील अजंग येथील शाळेच्या भेटीदरम्यान त्यांनी ही घोषणा केली. शिक्षकांसाठी ठराविक गणवेश निश्चित करण्यात येणार असून, त्यासाठी शासनाकडून विशेष निधीही मंजूर केला जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांप्रमाणेच राज्यातील शिक्षकही एकसारख्या ड्रेसमध्ये दिसणार आहेत.