Home / राजकीय / महापालिका निवडणुकीसाठी ९ जूनला ठाकरे गटाचा मेळावा

महापालिका निवडणुकीसाठी ९ जूनला ठाकरे गटाचा मेळावा

मुंबई – आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. सोमवार ९ जून रोजी मुलुंड येथील कालिदास...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. सोमवार ९ जून रोजी मुलुंड येथील कालिदास सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्याला लढा आपल्या मुंबईचा ही टॅगलाइन देण्यात आली आहे.
या मेळाव्यात आमदार आदित्य ठाकरे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे.
९ जूननंतर मुंबईतील विविध भागांमध्ये स्थानिक प्रश्नांवर ठाकरे गट आंदोलन करण्याची तयारी करत आहे. मुलुंड येथून सुरू होणाऱ्या या अभियानाच्या माध्यमातून मुंबईतील रस्ते घोटाळा, पाणीटंचाई, राज्य सरकारच्या विविध योजनांवरील असंतोष यावर आधारित आंदोलन आणि मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या मेळाव्यात आदित्य ठाकरे पुढील आंदोलनांची दिशा आणि आगामी मेळाव्यांचा तपशील पदाधिकाऱ्यांना देणार आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या