Home / राजकीय / सुपेकरांनी कैद्यांकडे ३०० कोटी मागितले ! आ.धसांचा आरोप

सुपेकरांनी कैद्यांकडे ३०० कोटी मागितले ! आ.धसांचा आरोप

पुणे – पुण्यातील विवाहिता वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात चर्चेत असलेले आणि हगवणे कुटुंबाशी संबधित पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर भाजपा...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

पुणे – पुण्यातील विवाहिता वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात चर्चेत असलेले आणि हगवणे कुटुंबाशी संबधित पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर भाजपा आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केला आहे. सुपेकर यांनी तुरुंगातील कैद्यांकडे ३०० कोटी रुपये मागितल्याचा आरोप धस यांनी केला आहे. धस यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देण्यास सुपेकरांनी नकार दिला.
भाजपा आमदार सुरेश धस म्हणाले की,पोलीस महानिरीक्षक पदावर असलेला माणूस १ लाख रुपये रोख घेतो आणि ५० हजार रुपयांचा मोबाईल घेतो. यापेक्षा दुर्दैव काय असावे ? माझ्याकडे सुपेकरबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामध्ये जेलमध्ये आरोपींना ३०० कोटी रुपये मागितल्याचीही तक्रार आहे. नातेवाईकाच्या सुनेकडून पैसे मागता, याचा अर्थ सुपेकर हा १०० टक्के दोषी आहे. नैतिकता राहिलेली नाही. प्रकरण अत्यंत खालच्या थराला गेल्याचे हे उदाहरण आहे. हगवणे कुटुंबाची १५० कोटींची मालमत्ता आहे. ही प्रॉपर्टी आता जाळायची की पेटवायची? असे लोक तुरुंगातून कितीही वर्षांनी बाहेर आले तरी त्यांच्यावर शेण फेकले पाहिजे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात जालिंदर सुपेकर यांचे नाव चर्चेत आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली. त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा पदावरून त्यांची उपमहासमादेशक होमगार्ड पदावर बदली करून पदावनतीची कारवाई झाली.

Web Title:
For more updates: , , , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या