Home / राजकीय / धनंजय मुंडे शपथपत्र प्रकरण ! १६ ऑगस्टला पुढील सुनावणी

धनंजय मुंडे शपथपत्र प्रकरण ! १६ ऑगस्टला पुढील सुनावणी

बीड – राष्ट्रवादी अजित पवार गटाचे परळीचे आमदार धनंजय मुंडे (MLA from Parli, Dhananjay Munde)यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान दाखल...

By: Team Navakal
Dhananjay Munde & Karuna Munde

बीड – राष्ट्रवादी अजित पवार गटाचे परळीचे आमदार धनंजय मुंडे (MLA from Parli, Dhananjay Munde)यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान दाखल केलेल्या शपथपत्रात पत्नी (wife) म्हणून करुणा मुंडे (शर्मा) यांच्या नावाचा आणि त्यांच्या मालमत्तेचा उल्लेख न केल्याबाबत दाखल झालेल्या तक्रारीवर आज परळी न्यायालयात (Parli Court)सुनावणी पार पडली. पण धनंजय मुंडे यांच्या वकिलांची (Munde’s lawyer)तब्येत ठीक नसल्याने न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी १६ ऑगस्टची तारीख निश्चित केली.

करुणा मुंडे (शर्मा) (Karuna Munde (Sharma) )यांनी धनंजय मुंडेंविरोधात तक्रार केली आहे की त्यांनी विधानसभा निवडणुकीत शपथपत्रात (election affidavit)खोटी माहिती दिली , याबाबत करुणा मुंडे यांनी ऑनलाईन स्वरूपात फौजदारी न्यायालयात तक्रार (criminal complaint online)दाखल केली होती. त्यानुसार, उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे व तीन मुलींसह करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचा उल्लेख करण्यात आला होता. पण करुणा शर्मा यांच्या नावावरील मिळकतीबाबत कोणताही उल्लेख नव्हता असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या तक्रारीवरून न्यायालयाने धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस ( notice)बजावली होती. आज सुनावणी दरम्यान करुणा मुंडे यांनी न्यायालयात आपल्या दोन्ही मुलांचे पासपोर्ट (passports)सादर केले असून त्यात धनंजय मुंडे यांचे नाव वडील म्हणून नमूद असल्याचे स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले.न्यायालयाने आता १६ ऑगस्टपर्यंत (August 16) आपली भूमिका सादर करण्यासाठी मुदत दिली आहे. त्यानंतर या प्रकरणात पुढील निर्णय (decision) होण्याची शक्यता आहे.

Web Title:
संबंधित बातम्या