Dcm Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोनवरून ओळखता न आल्याने करमाळा (Karmala)विभागाच्या पोलीस उपअधीक्षक (DYSP) अंजली कृष्णा (Anjali Krishna) यांना त्यांच्या संतापाचा सामना करावा लागला.अजित पवार आणि अंजली कृष्णा यांच्यात झालेल्या संभाषणाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.माढा तालुक्यातील कुर्डू गावात (Kurdu)अवैध मुरूम उत्खननाच्या तक्रारीवरून अधिकारी कारवाईसाठी दाखल झाले होते.
ग्रामस्थांशी बोलणी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते बाबा जगताप (NCP leader Baba Jagtap)यांनी अजित पवार यांना कॉल करून फोन अंजली कृष्णा यांच्याकडे दिला. मात्र अजित पवार स्वतः मी डीसीएम अजित पवार बोलतोय कारवाई थांबवा असे दोनवेळा सांगूनही उपअधीक्षक कृष्णा यांनी त्यांना ओळखले नाही आणि माझ्या अधिकृत क्रमांकावर संपर्क साधा असे उत्तर दिले.
या उत्तराने संतप्त झालेल्या उपमुख्यमंत्र्यांनी माझा चेहरा तरी ओळखाल ना (recognize) ? असे म्हणत व्हिडिओ तत्काळ व्हिडिओ कॉल करून अंजली कृष्णा यांना फैलावर घेतले. तुमची एवढी हिम्मत कशी झाली? असे म्हणत अजित पवार यांनी कारवाई थांबवण्याचे फर्मान सोडले. हा संपूर्ण प्रकार जवळपास तीन तास सुरु होता. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या परवानगीने मुरूम काढल्याचा दावा केला. मात्र अधिकृत कागदपत्रे नसल्यामुळे पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली होती.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
मुंबईच्या गणेशोत्सवावर १७ वर्षांत पालिकेचे २४७ कोटी रुपये खर्च
भारताने बनवली संपूर्णत: स्वदेशी मायक्रोप्रोसेसर चीप
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! विश्वचषकापूर्वीच दिग्गज गोलंदाजाने T20I क्रिकेटमधून घेतली निवृत्ती