बीड – परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या उर्फ ज्ञानोबा गित्ते (suspect Gotiya Gitte) हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे, गोट्या गित्तेवर दरोडा, हत्येचा प्रयत्न, चोरी, अपहरण, खंडणी, सरकारी कामात अडथळा यांसारख्या एकूण ४३ गंभीर गुन्ह्यांची (43 serious criminal case) नोंद आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच स्वतःचा व्हिडिओ जारी केला होता . तरी पोलिसांना तो सापडलेला नाही .
गोट्या गित्ते हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad)याचा कट्टर समर्थक आहे. गोट्या गित्तेच्या विरोधामध्ये बीड जिल्ह्यात परळी, अंबाजोगाई तालुक्यात दहशत निर्माण करण्यासह पुणे शहर व पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad,)येथे ९ गुन्हे, लातूर (Latur)जिल्ह्यात ३, परभणीमध्ये २, छत्रपती संभाजीनगरमध्ये १ आणि इतर जिल्ह्यांमध्ये ३ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तो गुन्हेगारी टोळीचा सक्रिय सदस्य असल्याचा संशय पोलिसांना आहे.
महादेव मुंडे हत्या प्रकरणात ज्ञानेश्वरी मुंडे यांनी गोट्या गित्तेचे नाव घेतल्यापासून तो पुन्हा चर्चेत आला. याआधीही परळीतील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणात तो सहभागी होता असा आरोप आहे.तर बीड पोलिसांकडून त्यांच्यावर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली आहे. मग या आधीच गोट्या गित्तेला पोलिसांनी अटक का केले नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.