वायनाड – निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात मालमत्तेविषयी चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत पराभूत उमेदवाराने दाखल केलेल्या याचिकेवरुन Kerala High Court खासदार प्रियांका गांधी यांना नोटीस पाठवली आहे.
राहुल गांधी दोन मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर त्यांनी वायवाडची जागा सोडली होती. या ठिकाणी त्यांची बहीण व काँग्रेस नेत्या MP Priyanka Gandhi Vadra यांनी निवडणूक लढवत ४ लाख मतांनी विजय मिळवला. यानंतर आता पराभूत भाजपा उमेदवार Navya Haridas यांनी त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली. याचिकेत म्हटले आहे की, प्रियांका गांधी यांनी उमेदवारी अर्जात स्वतःची व कुटुंबियांची माहिती योग्यरित्या जाहीर केली नाही. प्रियांका गांधी यांनी अर्जात स्वतःची १२ कोटींहून अधिक संपत्ती जाहीर केली होती. त्यांच्याकडे ४.२४ कोटी रुपयांची स्थावर व ७.७४ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे त्यांनी नमूद केल होते. त्यांच्या पतीकडे एकूण ६५.५४ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचेही त्यांनी अर्जात म्हटले होते. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना नोटीस पाठवली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी ऑगस्टमध्ये होणार आहे.
