मुंबई – हनीट्रॅपच्या (Honey Trap) माध्यमातून आपल्या राज्यातले गोपनीय दस्तऐवज बाहेर पडत आहेत, असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते नाना पटोले (nana patole) यांनी आज विधानसभेत (Legislative Assembly) केला. यावेळी पटोलेंनी हा विषय औचित्याच्या मुद्याद्वारे विधानसभेच्या पटलावर मांडला व याबाबत सरकारकडे स्पष्टीकरणही मागितले. या प्रकरणी योग्य ती दखल घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी सरकारला दिले.
पटोले पुढे म्हणाले की (Congress MLA Nana Patole said ), या प्रकरणात राज्यातील वरिष्ठ अधिकारी, आयएएस अधिकारी व काही मंत्री समाविष्ट आहेत, अशी चर्चा सुरू आहे. गोपनीय दस्तऐवज (confidential documents)बाहेर जातील यासाठी हनीट्रॅप (Honey Trap’ Scandal)(लावला आहे. ही महत्वपूर्ण बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देणे माझे कर्तव्य समजतो. या हनीट्रॅपच्या माध्यमातून गोपनीय कागद समाजविघातक संघटनांकडे गेले तर राज्यासह संपूर्ण व्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. या प्रकरणी राज्यात काय सुरू आहे? याची वस्तुस्थिती सरकारने सभागृहापुढे स्पष्ट करावी. या ठिकाणी आपण आमचे पालक आहात. सरकारकडून (government ) तुम्ही ही माहिती घेऊन सभागृहाला कळवली पाहिजे.