धाराशिव – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Maharashtra Revenue Minister Chandrashekhar Bawankule)यांचा ड्रग प्रकरणातील (drug case)कथित मास्टरमाईंड विनोद पिंटू गंगणे (Vinod Gangane)याच्या हस्ते सार्वजनिकरित्या सत्कार करण्यात आला. तुळजाभवानी मंदिर (Tulja Bhavani)विकास आराखड्यासाठी ८५० कोटी रुपये मंजूर (approving ₹850 crore) केल्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा आमदार राणा पाटील (BJP MLA Rana Patil)यांच्या जाहीर सत्काराचा कार्यक्रम तुळजापूर येथे आयोजित करण्यात आला.
यावेळी विनोद गंगणेला शाल-श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. इतकेच नव्हे तर मंत्री बावनकुळे यांनी गंगणेला जवळ बोलावून पाठ थोपटली आणि त्याच्या कार्याचे कौतुक केले. या घटनेचे अनेक फोटो व व्हिडिओ व्हायरल (viral)झाले असून, नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
उबाठा आमदार अंबादास दानवे (MLC Ambadas Danve) म्हणाले की, तुळजापूर ड्रग प्रकरणातील आरोपीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच संरक्षण दिले. आई तुळजाभवानी महिषासुरमर्दिनी आहे. हे बावनकुळे यांनी लक्षात ठेवावे.