आमदार निवास कामगाराला मारहाण परवाना निलंबित ! आमदारावर गुन्हा नाही

MLA hostel canteen

मुंबई– आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिल्याने शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्यानंतर आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या अन्न आणि खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेवर (quality of food served) प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आता आमदार निवासातील कॅन्टीन (MLA hostel canteen) चालवण्याचा परवाना अन्न व औषध प्रशासन विभागाकडून ((FDA)) निलंबित करण्यात आला आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या प्रकरणानंतर ठेकेदारावर (contractor) ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र आमदारावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही .

निकृष्ट जेवण मिळाल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाडांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्यानंतर या कॅन्टीनमधील पदार्थाची एफडीएने तपासणी केली.त्यानंतर हा परवाना निलंबित करण्यात आला.आमदार गायकवाड यांनी ज्या आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये मारहाण केली होती, तिथे अन्न आणि औषध प्रशासन अर्थात एफडीएचे पथक दाखल झाले. एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून आकाशवाणी आमदार निवासाच्या कँटीनमधील संपूर्ण स्टोअर रूमची तपासणी करण्यात आली.यावेळी त्यांनी खाद्यपदार्थ आणि तेलाच्या बाटल्यांचे सॅम्पल गोळा केले. हे सगळे नमुने सील करून फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले. तपासणी दरम्यान स्टोअर रूमचे ऑडिटही करण्यात आले. संपूर्ण अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे.