नवी दिल्ली – ऑपरेशन सिंदूर अर्ध्यावर थांबवल्याच्या मुद्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र (Prime Minister Narendra Modi)मोदींवर निशाणा साधला. ट्रम्प सर्व सत्य बाहेर काढतील या भितीने मोदींनी काल लोकसभेत (Lok Sabha)ट्रम्प यांचे नाव घेतले नाही,अशी बोचरी टीका राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी केली.
काल लोकसभेत पहलगामवरील दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर (Pahalgam and Operation Sindoor.)या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (U.S. President Donald Trump) यांनी भारत – पाकिस्तानदरम्यानचा (India and Pakistan)संघर्ष आपण थांबवल्याच्या केलेल्या दाव्यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना डिवचले होते. ट्रम्प जर खोटे बोलत असतील तर पंतप्रधान मोदींनी लोकसभेत ट्रम्प यांचे नाव घेऊन ते खोटे बोलत आहेत,असे ठणकावून सांगावे,असे आव्हान राहुल गांधी यांनी मोदींना दिले होते. मात्र त्यानंतर मोदींनी केलेल्या भाषणात ट्रम्प यांच्या नावाचा उल्लेख केला नाही.त्यावरून आज राहुल गांधी यांनी संसद भवनाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना मोदींवर टीका केली.