६५ जागांवर विजयी करून देतो ! आता संजय राऊतांचा गौप्यस्फोट

UBT MP Sanjay Raut

मुंबई– शरद पवार यांना १६० जागा जिंकवून देण्याची ऑफर दिली होती तेच लोक उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंनाही भेटले होते आणि त्यांनी ६५ जागा जिंकवून देण्याचीही ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट उबाठा खासदार संजय राऊत (UBT MP Sanjay Raut)यांनी केला.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, निवडणुकीपूर्वी (Before elections)काही लोकांनी भेटून १६० जागा मिळवून देतो, असे शरद पवार यांनी सांगितले आहे. यापैकी काही लोक लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनाही भेटले होते. आम्ही त्यांना स्पष्ट सांगितले की, आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. त्यावेळी देशातील वातावरण पाहता, लोकसभेत (Lok Sabha)आम्ही १०० टक्के विजय मिळवू, अशी आम्हाला खात्री होती आणि महाराष्ट्रात आम्ही खरेखर ते यश मिळवले. त्यामुळे अशा प्रकारे गैरमार्गाने विजय मिळवण्याची आम्हाला गरज नव्हती. विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly elections)हेच लोक पुन्हा आमच्याकडे आले. ते म्हणाले, तुमच्या ६० ते ६५ अडचणीच्या जागा सांगा. त्या आम्ही ईव्हीएमच्या (EVM)माध्यमातून जिंकून देऊ. आम्ही पुन्हा नकार दिला. मात्र त्यांनी इतकेही सांगितले की, तुम्हाला जरी ही मदत नको असली तरी सत्तेत असलेले लोक ईव्हीएम आणि मतदारयादीत फेरफार करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे तुमचे अपयश आम्हाला दिसते, म्हणून आम्ही मदत करू शकतो. तरीही आमचा विश्वास निवडणूक यंत्रणा, निवडणूक आयोग आणि लोकशाहीवरच राहिला. पण आता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जे पुरावे सादर केले आहेत, त्याची चौकशी होणे आवश्यक आहे.

धनखड यांना हाऊस अरेस्ट केले?
संजय राऊत म्हणाले की, जगदीप धनखड (“Vice President Jagdeep Dhankhar) यांनी २१ जुलै रोजी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून ते कोणाच्याही संपर्कात नाहीत. त्यांची प्रकृती कशी आहे? ते बरे आहेत ना? मुळात ते आहेत तरी ना? याची माहिती आम्हाला हवी आहे. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात त्यांना त्यांच्या राहत्या घरी हाऊस अरेस्ट केल्याची चर्चा असून ती खरी वाटते. आपल्याला नको असलेले विरोधक गायब करणे, तुरुंगात डांबणे ही पद्धत चीन आणि रशियासारख्या(China and Russia communist)कम्युनिस्ट देशांत आहे. भाजपाचे भीष्म पितामह लालकृष्ण आडवाणी (Lal Krishna Advani) यांनाही अशाच प्रकारे गप्प केले गेले.