Supriya Sule : माझी राख होईल असे अनेकांना वाटले होते. पण मी भरारी घेतली असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis)यांनी केले होते. या विधानावर आता शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पलटवार करत राजकारणात कधीच कोणी संपत नाही आणि कोणाची राख होत नाही असा टोला लगावला.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांची राख होईल असे मला कधीच वाटले नाही. वास्तविक राजकारणात कधीच कोणी संपत नाही आणि कधीच कोणाची राख होत नाही. देवेंद्र फडणवीस यांचे कधी असे होईल असे ध्यानीमनीदेखील नाही. कोणीही कोणाबद्दलही असा विचार करू नये. प्रत्येक नेता आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. कोणी कोणाला संपवण्याची भाषा करणे योग्य नाही.
सिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यावर त्या पुढे म्हणाल्या की, सिंचन घोटाळ्यावर माझा फारसा अभ्यास नाही. मात्र त्या काळात या विषयावर सर्वाधिक आरोप प्रत्यारोप हे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीच केले होते. त्यामुळे याविषयी प्रश्न विचारायचे असतील, तर ते मला न विचारता त्यांनाच विचारा. सिंचन घोटाळ्याबाबत सर्वाधिक माहिती त्यांच्याकडेच आहे.
हे देखील वाचा –
बीड तुरुंगात कैदी अधीक्षकांची गाडी धुतानाचा व्हिडिओ व्हायरल
रायगडमध्ये साखरचौथ गणेशोत्सवाची तयारी ! ८८० मूर्तींची प्रतिष्ठापना होणार