राष्ट्रवादी पक्ष-चिन्हावर २२ जुलै रोजी सुनावणी

NCP party-symbol Hearing on 22nd July

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत मंगळवार २२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात (supreme court) सुनावणी होणार आहे. न्या. सूर्यकांत यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार (Sharad Pawar) यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी होईल. राष्ट्रवादी काँग्रेसची दोन गटांत विभागणी झाल्यानंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार (ajit pawar) यांच्या गटाकडे गेले आहे. या निर्णयाविरोधात शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालय अंतिम निर्णय देईपर्यंत शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी जाहिरातींमध्ये या प्रकरणी अंतिम सुनावणी झालेली नाही, अशी सूचना देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला दिला होता. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, शिवसेना (Shiv Sena) पक्ष आणि चिन्ह प्रकरणी कोर्टाने सुनावणीसाठी ऑगस्ट महिन्यात अंतिम तारीख ठरवली आहे.