नवी दिल्ली – महाराष्ट्रातील मराठी माणसांबद्दल गरळ ओकणारे भाजपाचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे (BJP leader Nishikant Dubey)पुन्हा एकदा बरळले.यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तळी उचलून धरताना भाजपालाच घरचा आहेर दिला. मोदींशिवाय भाजपा शून्य आहे,असे दुबे म्हणाले.
एका वृत्तसंस्थेला दुबे यांनी दिलेल्या मुलाखतीचा दोन मिनिटांचा टिझर (two-minute teaser of interview)आज प्रकाशित झाला. त्यामध्ये दुबे यांनी हे वक्तव्य केले आहे. ते म्हणतात की सध्या अशी परिस्थिती आली आहे की मोदींना (Narendra Mod)भाजपाची नव्हे तर भाजपालाच मोदींची गरज (bjp party needs modi)आहे. मोदी नसतील तर भाजपा शून्य होऊन जाईल. भाजपाला आगामी लोकसभा निवडणुका मोदी यांच्या नेतृत्वाखालीच लढवाव्या लागतील. तसे झाले नाही तर भाजपाला १५० जागाही मिळणे कठीण (on’t be able to win even 150 seats )आहे.
या टिझरमध्ये दुबे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray )आणि उबाठाचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा गरळ ओकली. राज-उध्दव जर महाराष्ट्राबाहेर कोणत्याही राज्यात गेले तर लोक त्यांना आपटून आपटून मारतील,असे अत्यंत चिथावणीखोर वक्तव्य दुबे यांनी केले.
