Home / मनोरंजन / Nitesh Rane Allegations : कोकणात १५ वर्षांत एकही धरण नाही! नीलेश राणेंचा आरोप

Nitesh Rane Allegations : कोकणात १५ वर्षांत एकही धरण नाही! नीलेश राणेंचा आरोप

Nitesh Rane Allegations : शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे (MLA Nilesh Rane) यांनी आज विधानसभेत (Legislative Assembly) लक्षवेधी मांडताना कोकणातील...

By: Team Navakal
Nitesh Rane Allegations
Social + WhatsApp CTA

Nitesh Rane Allegations : शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे (MLA Nilesh Rane) यांनी आज विधानसभेत (Legislative Assembly) लक्षवेधी मांडताना कोकणातील धरणांच्या प्रश्नावरून सरकारवर जोरदार टीका केली. गेल्या १२ ते १५ वर्षांत कोकणात (Konkan dam) एकही धरण पूर्ण झालेले नाही, असे सांगत निधी नेमका कुठे खर्च होत आहे, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

नीलेश राणे म्हणाले की, कोकणात सॉयल टेस्टिंगच्या नावाखाली अधिकारी प्रत्येकी २०–२० लाख रुपये खर्च करत आहेत. मात्र प्रत्यक्षात सॉयल टेस्टिंग होत आहे का? याची तपासणी करावी. त्याचप्रमाणे जिओग्राफिकल सर्व्हेच्या (Geographical surveys)नावाखाली लाखो रुपये खर्च झाल्याचे दाखवले जाते, पण प्रत्यक्षात असा सर्व्हे झाला आहे का, याबाबतही संशय आहे. गेल्या १२–१५ वर्षांत कोकणात एकही धरण उभे राहिलेले नाही. मग एवढा निधी नेमका कुठे गेला?

ते पुढे म्हणाले की, मी या प्रकरणी सभागृहात लक्षवेधी मांडणार असल्याचे समजताच चार दिवसांपूर्वी एका कंत्राटदाराने (contractor) काम सुरू केल्याचा देखावा निर्माण केला. तिकडे फक्त दगड टाकण्यास सुरुवात करण्यात आली आणि अधिकाऱ्यांनी या वर्षाअखेर काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. काम रखडण्यामागे लोकांचा विरोध असल्याचे कारण दिले जात आहे. मात्र २००५ साली लोकांचा कोणताही विरोध नव्हता, तसेच भूसंपादनही झाले आहे. तरीही आज भूसंपादनाचे कारण पुढे केले जात आहे. आमच्या कोकणावर अन्याय का करता, एवढाच प्रश्न विचारू शकतो.’ कोकणासाठी २८ वर्षे वाट पाहिली, तरी एकही धरण पूर्ण झाले नाही, याचे उत्तर मंत्र्यांनी द्यावे.

या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री संजय शिरसाट (Minister Sanjay Shirsat)म्हणाले की, कुडाळ तालुक्यातील लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पाबाबत लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. सध्या या प्रकल्पातील मुख्य धरणाचे मातीकाम सुमारे ८० टक्के पूर्ण झाले असून विमोचनाचे कामही पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.


हे देखील वाचा –

मनरेगाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव; महात्मा गांधी ऐवजी पूज्य बापू

NGT Halts Tapovan Cutting Till Jan 15 : तपोवन वृक्षतोडीला हरित लवादाची १५ जानेवारीपर्यंत स्थगिती

SHANTI Bill : ‘शांती’ विधेयक काय आहे? 60 वर्षांनंतर अणुऊर्जा क्षेत्रातील सरकारी मक्तेदारी संपणार

Web Title:
संबंधित बातम्या