बडगुजरांच्या प्रवेशाचा विरोध मावळलेला नाही ! हिरेंची पोस्ट

Opposed to the Badgujars' BJP entry has not subsided ! MLA Seema Hire

Opposed to the Badgujars’ BJP entry has not subsided ! MLA Seema Hire

नाशिक – नाशिकमधील ठाकरे गटाचे माजी पदाधिकारी सुधाकर बडगुजर UBT Sudhakar Badgujar यांच्या भाजपा प्रवेशाचा विरोध मावळलेला नसल्याची एक्स पोस्ट नाशिक पश्चिमच्या MLA Seema Hirey भाजपा आमदार सीमा हिरे यांनी केली आहे. Nashik Politcs राज्यात MNC Election स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षात हालचाली सुरु आहेत.काही दिवसांपूर्वी सुधाकर बुडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर ठाकरे गटातून त्यांची हकालपट्टी झाली. त्यानंतर बडगुजर भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली. उद्या हा प्रवेश होणार असल्याचे समजते. मात्र त्यांच्या भाजपा प्रवेशाला स्थानिक पातळीवर अंतर्गत विरोध सुरू होता. यादरम्यान भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी म्हटले की बडगुजर यांना भाजपात घेतले नाही तरी ते इतर पक्षात जाणार आहेत. त्यामुळे त्यांना पक्षात प्रवेश दिला पाहिजे. वरिष्ठांचा निर्णय आम्हाला मान्य असेल. त्यामुळे बडगुजर यांना होणारा विरोध मावळला असून त्यांच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त ठरल्याची चर्चा सुरु होती. परंतु त्यानंतर BJP VS UBT भाजपाच्याच आमदार सीमा हिरे यांनी एक्सवर लिहिले की,पक्ष प्रवेशाला विरोध मावळलेला नाही, कृपया चुकीच्या बातम्या पसरवू नये.