पवारांचा १६० जागांचा गौप्यस्फोट ! विरोधक म्हणाले, दावा हास्यास्पद

Sharad Pawar

नागपूर– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (Nationalist Congress Party) शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन अज्ञात व्यक्तींनी आपली भेट घेऊन १६० जागा जिंकून देण्याची खात्री दिली होती, असा मोठा गौप्यस्फोट केला. मात्र त्यांचा हा गौप्यस्फोट अत्यंत हास्यास्पद आहे, अशी टीका सत्ताधार्यांनी केली.

शरद पवार म्हणाले की, राहुल गांधींनी (Rahul Gandhi)उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सखोल विचार करण्याची गरज आहे. संसदीय लोकशाही पद्धतीवर लोकांमध्ये शंका निर्माण होणे योग्य नाही. याची योग्य चौकशी झाली पाहिजे. आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर पाहिजे. यासाठी सोमवारी संसदेतील सर्व सहकाऱ्यांचा मोर्चा निवडणूक आयोगावर निघणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या (assembly elections)जाहीर झाल्या तेव्हा दिल्लीत मला दोन जण भेटायला आले होते. त्यांची नावे व पत्ते आत्ता माझ्याकडे नाहीत. त्यांनीही ते दिले नव्हते. ते म्हणाले होते की, महाराष्ट्र विधानसभेच्या (Maharashtra assembly seats.) २८८ जागांपैकी १६० जागा (160 seats f)जिंकून देण्याची गॅरंटी आम्ही तुम्हाला देतो. पण त्यावेळी माझ्या मनात निवडणूक आयोगाविषयी (Election Commission) कोणतीही शंका नव्हती. मी असे लोक भेटतच असतात म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यांची राहुल गांधी यांची मी भेट घालून दिली. त्यांनी आपले म्हणणे राहुल गांधींपुढे मांडले. मात्र यात आपण पडायला नको, हा आपला मार्ग नाही. आपण लोकांमध्ये जाऊ, लोकांचा जो निर्णय असेल तो स्वीकारू असा माझा आणि राहुल गांधींच निर्णय झाला.

दरम्यान, आपल्याला भेटायला गेलेल्या दोन माणसांचे नाव आणि पत्ता पवारांना माहीत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे शरद पवारांनी नंतर त्यांची राहुल गांधीशीही भेट घालून दिली. मोठ्या नेत्यांना भेटायला येणार्या सगळ्यांची नोंद होत असते.