Rename MGNREGA – केंद्रातील मोदी सरकारने (Modi government) आता मनरेगा योजनेच्या नावातून महात्मा गांधींचे (Mahatma Gandhi)नाव वगळून नवे नाव देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामी रोजगार (Rural Employment) हमी योजनेचे नाव आता पूज्य बापू ग्रामीण रोजगार हमी योजना असे करण्यात येणार आहे.यासाठी कायदा करण्यात येणार असून त्याचे विधेयक पुढील आठवड्यात संसदेत मांडले जाण्याची शक्यता आहे,अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
मनरेगा योजना (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme )सन २००५ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या नावाने लागू करण्यात आली होती.नंतर योजनेचे नाव बदलून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असे करण्यात आले होते.आता मोदी सरकार त्यातील महात्मा गांधी हे शब्द काढून त्याजागी पूज्य बापू असे शब्द वापरणार आहे.नावात बदल करताना या योजनेतील कामाचे दिवस १०० वरून १२५ करण्यात येणार असून कामगारांची किमान मजुरी वाढवून दिवसाला २४० रुपये करण्यात येणार आहे.

काँग्रेस (Congress) संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी संसदे मनरेगा योजनेतील कामाचे दिवस वाढवून किमान १५० दिवस करावे आणि किमान मजुरी दिवसाला ४०० रुपये करावे अशी मागणी केली होती.
तत्कालीन पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग ( Dr. Manmohan Singh) यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने सुरू केलेली मनरेगा ही योजना म्हणजे काँग्रेसच्या अपयशाची ढळढळीत निशाणी आहे,अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सत्तेवर येण्याआधी सातत्याने करत होते. मात्र आता त्याच मोदी यांनी या योजनेवरील महात्मा गांधी यांचा ठसा पुसण्याचा प्रयत्न केला आहे.
हे देखील वाचा –
NGT Halts Tapovan Cutting Till Jan 15 : तपोवन वृक्षतोडीला हरित लवादाची १५ जानेवारीपर्यंत स्थगिती
SHANTI Bill : ‘शांती’ विधेयक काय आहे? 60 वर्षांनंतर अणुऊर्जा क्षेत्रातील सरकारी मक्तेदारी संपणार
वनताराचा ५० हुन अधिक बिबटे घेण्यास नकार; बिबट्यांचा बंदोबस्ताचा प्रश्न अधिक गंभीर?








