Home / राजकीय / Bihar Voter Adhikar Yatra: मतदार हक्क यात्रेदरम्यान राहुल गांधी उतरले शेतात

Bihar Voter Adhikar Yatra: मतदार हक्क यात्रेदरम्यान राहुल गांधी उतरले शेतात

Congress MP Rahul Gandhi


कटिहार – काँग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi)यांची मतदार अधिकार यात्रा (Bihar Voter Adhikar Yatra)मतांच्या चोरीविरोधातील एक ऐतिहासिक चळवळ असल्याचे काँग्रेस नेते वेणुगोपाल(Congress leader K.C. Venugopal)यांनी समाजमाध्यमावर म्हटले आहे. राहुल गांधी यांनी आज कटिहारमधील मखान्याची लागवड पाहण्यासाठी थेट शेतात जाऊन तेथील लोकांशी संवाद साधल्याचेही त्यांनी म्हटले आहे.


राहुल गांधी यांच्या मतदार अधिकार यात्रेचा आज सातवा दिवस असून त्यांच्याबरोबर राजदचे नेते तेजस्वी यादवही (RJD leader Tejashwi Yadav)उपस्थित होते. यावेळी वाटेत त्यांना मखान्याची शेती दिसल्यानंतर त्यांनी ती कशी करतात. त्याच्या बिया कशा पेरल्या जातात हे सारे समजून घेतले. वेणूगोपाल यांनी म्हटले की, राहुल गांधी यांच्या यात्रेत काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होणार असून येत्या २६ व २७ ऑगस्ट रोजी खासदार प्रियांका गांधी (August 26–27, Priyanka Gandhi Vadra)या यात्रेत सहभागी होतील. त्याचबरोबर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (Tamil Nadu CM M.K. Stalin,), कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, तेलंगण व हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री (Telangana and Himachal Pradesh. CM)सहभागी होणार आहेत. राहुल गांधी यांची यात्रा आज सिमरिया येथे असून काल रात्री झालेल्या त्यांच्या सभेच्या वेळी स्थानिक प्रशासनाने वीजपुरवठा बंद केला होता.