मुंबई – मनसेचे माजी आमदार राजू पाटील (Former MNS MLA Raju Patil ) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि खासदार श्रीकांत शिंदे (shrikant Shinde)या पितापुत्रांवर टीका केली आहे. ह्यांना ना जनाची ना मनाची, असे त्यांनी म्हटले आहे.
मनसेचे माजी आमदार राजू पाटील एक्सवर लिहिले की, रक्षाबंधनाच्या दिवशी (Raksha Bandhan) नागरिकांना ट्रॅफिकचे आंदण आहे. वर्षानुवर्षे तोच रस्ता, तेच ट्रॅफिक (traffic), तीच घुसमट आणि तीच मागणी. आता आम्हालाही त्याच मुद्द्यावरून सरकारला शालजोडीत द्यायला लाज वाटू लागली. परंतु त्यांना नागरिकांच्या जीवाची, वेळेची आणि जीवनाची काहीही पडलेली नाही. रस्ते रुंदीकरण केले, कितीतरी ब्रिज बांधले त्याचा मलिदा खाऊन झाला. पुन्हा रस्ते आणि पूल दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. म्हणजे पुन्हा मलिदा (money)खाण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
पण ट्रॅफिक चा प्रश्न काही केल्या या आमच्या बालकमंत्र्याला सोडवता येत नाही. कारण या भ्रष्टनाथ मलिदा खाणाऱ्यांसाठी चॉपर आहेत, हवाईमार्ग आहेत, रस्त्यावरून जायची वेळ आली तर नागरिकांना थांबवून यांच्या गाड्यांसाठी रस्ता मोकळा करणारे ट्रॅफिक कंट्रोलर आहेत. सामान्य माणसाचे काय? कल्याण-डोंबिवलीकरांचे (Kalyan-Dombivli)अर्ध आयुष्य या ट्रॅफिकच्या गर्दीतच सुरू होणार आणि या गर्दीतच संपणार. हे सत्ताधारी मात्र या टक्केवारीतून ओरबाडलेला पैसा वाटून दुसऱ्यांचे पक्ष फोडून आपली गद्दार गॅंग वाढविण्यात मग्न राहणार. खरेतर आश्चर्य त्या लोकांचे वाटते ज्या लोकांना या वाहतुककोंडीचा त्रास होतो (suffer from this traffic)व तरीही ते धर्माच्या व भावनेच्या आहारी जाऊन या बकासुरांना मतदान(vote)करतात.