रायगड -रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात आज शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते राजीव साबळे (leader and spokesperson Rajiv Sable) यांनी शक्तिप्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar), प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले (minister Bharat Gogawale.)यांना जबरदस्त राजकीय धक्का बसला आहे.
रायगड पालकमंत्री पदावरून राज्यात अजित पवार गट आणि शिंदे गट यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. या पार्श्वभूमीवर साबळे यांच्या पक्षप्रवेशामुळे गोगावले यांची ताकद कमी झाली आहे. राजीव साबळे चारवेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा प्रभाव आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राजीव साबळे यांच्यासह माणगावमधील काही नेत्यांचे पक्षप्रवेश या मेळाव्यात झाले. महायुती सरकारमध्ये आपण विकासाची (development)काम करण्यासाठी आलो आहोत. सत्तेत असताना लोकांची कामे झाली पाहिजेत. सत्तेत असताना आपण काम करणार नसू तर मग सत्ता नसताना ते काम झाले असते तर बरे झाले असते असे