मुंबई – महायुती सरकारमधील (Mahayuti government) मंत्र्यांच्या कारनाम्यांवर कडाडून टीका करताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (spokesperson Sanjay Raut) यांनी आज संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करून नव्या आणि स्वच्छ चारित्र्य असलेल्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी द्यावी,अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis,)यांना उद्देशून केली.
सध्या महायुतीमध्ये असलेले एक एक मंत्री (minister) म्हणजे नमुने आहेत. कोण डान्सबार (dance bar)चालवतो, कोण सिगारेट ओढत (smoking a cigarette)उघड्या बॅगेत नोटांची बंडले (cash) घेऊन बसतो तर कोण मारामारी (physical assault)करतो. असल्या मंत्र्यांना घेऊन फडणवीस राज्याचा गाडा नीट हाकू शकणार नाहीत. त्यामुळे हे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करून नव्या आणि स्वच्छ चारित्र्याच्या लोकांना संधी द्या,असे राऊत म्हणाले.
सुमित फॅसिलिटीज कंपनीचा मालक अमित साळुंखे (Sumit Facilities company owner Amit Salunkhe) याच्या अटकेवरून राऊत यांनी आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करून एसआयटी (Special Investigation Team) चौकशीची मागणी केली.