Home / Other Sampadakiya / ग्रीसमधील वणव्यांमुळे नागरिकांचे स्थलांतर

ग्रीसमधील वणव्यांमुळे नागरिकांचे स्थलांतर

अथेन्स – अमेरिका आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट आली असताना परिस्थितीत युरोपातील ग्रीस देशात मोठा आगीचा वणवा भडकला आहे....

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

अथेन्स –

अमेरिका आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट आली असताना परिस्थितीत युरोपातील ग्रीस देशात मोठा आगीचा वणवा भडकला आहे. याचा ग्रीसमधील रोड्स आणि कोर्फू या बेटांवर सगळ्यात जास्त परिणाम होत आहे. ही आग दूरपर्यंत पसरल्याने या दोन्ही बेटांवरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

मागील आठवड्यापासून हे वणवे सुरूच आहेत. ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तरीही आग पसरतच आहे. गेल्या आठवड्यापासून येथे राहणाऱ्या ३०,००० नागरिकांना हलवण्यात आले होते. यामध्ये स्थानिक आणि पर्यटकांचा समावेश आहे. काल सोमवारी आणखी २,५०० नागरिकांना कोर्फू बेटावरून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.

Web Title:
संबंधित बातम्या