Home / Top_News / दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या शिवसैनिकांचा भीषण अपघात

दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या शिवसैनिकांचा भीषण अपघात

एकाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी सांगली दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक रात्रभर प्रवास करून नवी मुंबईत दाखल झाले. मेळाव्यासाठी मुंबईला निघालेल्या...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

एकाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

सांगली

दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक रात्रभर प्रवास करून नवी मुंबईत दाखल झाले. मेळाव्यासाठी मुंबईला निघालेल्या सांगलीच्या शिंदे गटातील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या गाडीला आज पहाटेच्या सुमारास अपघात झाला. कवठेमहांकाळ तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरढोण गावाजव हा अपघात झाला. या भीषण अपघातात एका पदाधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर तीन पदाधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. एक भरधाव ट्रकने पदाधिकाऱ्यांच्या गाडीला धडक दिल्याने हा अपघात झाला.

Web Title:
संबंधित बातम्या