मुंबई- लालबागच्या गणेश गल्लीतील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा रविवार २१ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गणेश मैदान,गणेश गल्ली, लालबाग येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.तरी या मंगलमय सोहळ्यास बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहावे,असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे, सरचिटणीस स्वप्निल परब, खजिनदार निलेश महाडेश्वर यांनी केले आहे.या गणेशोत्सव मंडळाचे यंदा ९७ वे वर्ष आहे.
