Home / Uncategorized / इस्रायलचेही इराणच्या आण्विक तळावर हल्ले! युद्ध तापले! कतारमधील अमेरिकन तळ लक्ष्य

इस्रायलचेही इराणच्या आण्विक तळावर हल्ले! युद्ध तापले! कतारमधील अमेरिकन तळ लक्ष्य

जेरूसलेम- अमेरिकेने इराणवरील अणुतळांवर हल्ले केल्यानंतर आज इस्रायल आणि इराणमध्ये हल्ल्याचे सत्र सुरूच राहिले. इस्रायलने इराणची अणुकेंद्र, इराणी सैन्याचे मुख्यालय,...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA


जेरूसलेम- अमेरिकेने इराणवरील अणुतळांवर हल्ले केल्यानंतर आज इस्रायल आणि इराणमध्ये हल्ल्याचे सत्र सुरूच राहिले. इस्रायलने इराणची अणुकेंद्र, इराणी सैन्याचे मुख्यालय, विमानतळ आणि तुरुंगावर हल्ले केले. अमेरिकेने काल जिथे बस्टर बॉम्ब टाकले त्याच ठिकाणी इस्रायलने पुन्हा हल्ला केला. तर इराणने इस्रायलच्या तेरा शहरांवर हल्ला करत त्याला प्रत्युतर दिले. इराणने कतारच्या दोहा आणि इराकमधील अमेरिकेच्या लष्करी एअरबेसवर 10 मिसाईल डागली. मात्र या मिसाईल जमिनीवर येण्याआधीच अमेरिकन लष्कराने हवेतच नष्ट केल्या. त्यामुळे कतारमध्येही एकच खळबळ उडाली. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची भेट घेतली. त्यावेळी इराणला मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
इस्रायलने आज इराणवरील हल्ल्यांचा धडाका लावला. इस्रायलने आज सांगितले की, आमच्या सैन्याने आज इराणच्या फोर्डो आण्विक तळावर हल्ला करून या ठिकाणी जाणारे मार्ग उद्ध्वस्त केले. या ठिकाणी जाण्याचा मार्ग बंद करणे हा या हल्ल्याचा उद्देश होता. याशिवाय इराणच्या सहा विमानतळांवर हल्ला चढवण्यात आला. यामध्ये इस्रायली सैन्याने सोमवारी सकाळी इराणमधील सहा विमानतळांवर ड्रोन हल्ले केले – मशहद, तेहरान, हमादान, देझफुल, शाहिद बख्तियारी आणि तबरीझ यांचा समावेश होता. यामध्ये इराणचे 15 लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर नष्ट झाली. तहेरान येथील कुख्यात एव्हिन तुरुंगावरही हल्ला करण्यात आला. या तुरुंगात राजकीय कैद्यांना ठेवले जाते. इस्रायली सैन्याने तेहरानमधील अनेक ठिकाणांना लक्ष्य केले. त्यात रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या बासीज फोर्सचे मुख्यालय रेव्होल्युशनरी गार्डचे अंतर्गत सुरक्षा मुख्यालय यांचा समावेश होता. या हल्ल्यात इराणी सैन्याच्या एका तुकडीचे शेकडो सैनिक ठार झाल्याचा दावाही इस्रायलने केला. तेहरानमधील पॅलेस्टाईन चौकात बसवलेल्या इस्रायल विनाशक घड्याळालाही इस्रायली सैन्याने लक्ष्य केले. हे डिजिटल घड्याळ इराणी अधिकाऱ्यांनी एप्रिल 2021 मध्ये बसवले होते. त्यात 2040 पर्यंत काऊंटडाऊन होते. सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला खामेनी यांनी 2015 मध्ये दिलेल्या एका वक्तव्यानंतर हे घड्याळ येथे बसवण्यात आले होते. त्यांनी म्हटले होते की इस्रायल 25 वर्षांत नष्ट होईल. हे घड्याळ 2040 मध्ये आपोआप बंद होणार होते. इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात सुमारे आतापर्यंत 950 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 3,450 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती अमेरिकेच्या मानवाधिकार संघटनेने दिली आहे.
या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही इस्रायलच्या सफेद, तेल अवीव, अश्कलोन, अश्दोद आणि बेईसान या शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. इराणने इस्रायलवर 15 क्षेपणास्त्रे डागली. सर्व क्षेपणास्त्र हल्ले सुमारे 40 मिनिटांच्या कालावधीत झाले. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे या शहरातून सर्वत्र धुराचे लोट दिसत होते. आगही धुमसत होती. इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
दक्षिण इस्रायलमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. तेल अवीव शहरातही सायरनचे आवाज एकू आले. त्यानंतर लोक बंकरमध्ये धाव घेतली.
दरम्यान, आज इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची मॉस्कोमध्ये भेट घेतली. या भेटीवेळी पुतीन म्हणाले की, इराणवरील अमेरिकेचे हल्ले निराधार आहेत. रशिया इराणी लोकांना मदत करण्यास तयार आहे.
त्यापूर्वी, क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना हल्ल्यांबद्दल आगाऊ माहिती दिली नव्हती. इराण-इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी रशियाने मध्यस्थी करण्याची ऑफर दिली आहे. रशिया पुढे काय करेल हे इराणच्या गरजांवर अवलंबून आहे. कालच रशियाचे रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी असा दावा केला होता की, ‌’बरेच देश त्यांची अण्वस्त्रे थेट इराणला पुरवण्यास तयार आहेत.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या