Home / News / Free Fire : फ्री फायर गेममध्ये १४ लाख गमावल्याने मुलाची आत्महत्या

Free Fire : फ्री फायर गेममध्ये १४ लाख गमावल्याने मुलाची आत्महत्या

Free Fire – लखनौमध्ये (Lucknow)मोबाईलवरील फ्री फायर या ऑनलाईन गेमच्या व्यसनामुळे १३ वर्षीय मुलाने आत्महत्या (Suicide) केली. अवघ्या दीड महिन्यात...

By: Team Navakal
Free Fire

Free Fire – लखनौमध्ये (Lucknow)मोबाईलवरील फ्री फायर या ऑनलाईन गेमच्या व्यसनामुळे १३ वर्षीय मुलाने आत्महत्या (Suicide) केली. अवघ्या दीड महिन्यात वडिलांच्या बँक खात्यातील (Bank account) तब्बल १४ लाख रुपये या मुलाने गेमसाठी खर्च केले. ही रक्कम घर बांधणीसाठी शेतजमीन विकून जमा करण्यात आली होती.

हा मुलगा सतत फ्री फायर गेम खेळायचा. घरच्यांना त्याच्या वागण्यात (Behavior) बदल दिसून आला होता. त्याचे वडील बँकेतून २० हजार रुपये काढण्यासाठी गेल्यावर खाते रिकामे असल्याचे त्यांना आढळले . बँक स्टेटमेंटमध्ये गेमवरील इन-ॲप खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात पैसे गेले असल्याचे दिसले. याबाबत विचारण्याआधीच मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्येपूर्वी मोबाईलमधील सर्व फोटो, फोनची माहिती (Phone data) , समाज माध्यमांवरील खाते (Social media accounts) व फ्री फायर गेमसुद्धा पूर्णपणे डिलिट केला होता.

फ्री फायर हा बॅटल रॉयल (battle royale–style game) शैलीवरील गेम आहे. यात खेळाडूंना शस्त्रे शोधून शत्रूंशी लढावे लागते. मात्र या गेममध्ये आभासी शस्त्रे (weapons) व वस्तू खरेदी करण्यासाठी प्रत्यक्ष पैसे खर्च करावे लागतात. यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. २०२२ मध्ये डेटा गोपनीयता व सुरक्षिततेच्या कारणास्तव सरकारने या गेमवर बंदी घातली होती. मात्र, या गेमची अन्य आवृत्ती म्हणजे फ्री फायर मॅक्स नारुतो (Free Fire Max Naruto) हा गेम ऑनलाईन उपलब्ध आहे.

जुलै महिन्यात कोल्हापूरमध्ये एका मुलाने वडिलांच्या बँक खात्यातील तब्बल ५ लाख रुपये गेमवर खर्च केले होते. तर ऑगस्ट २०२५ मध्ये गोमतीनगर एक्स्टेन्शन भागातील अकरावी इयत्तेतील विद्यार्थ्याने ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनामुळे आत्महत्या केली होती. २०२४ मध्येही विद्यार्थ्यांपासून ते तरुण व्यावसायिकांपर्यंत अनेकांनी ऑनलाईन गेममध्ये पैसे गमावल्याची प्रकरणे समोर आली आहेत.


हे देखील वाचा

दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला पडतोय ‘काळा’; कारण काय? वाचा

भारतातल्या करव्यवस्थेत मोठा बदल, ‘GST 2.0 India’ मुळे गरजेच्या वस्तूंवर दिलासा

राज्यात पावसाचा इशारा ! अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या