खड्ड्यांचा १५ हजारांचा दंड रद्द ! गणेश मंडळांना दिलासा

dcm eknath shinde

मुंबई – सार्वजनिक गणेशोत्सव मंडप (Ganesh mandals) उभारण्यासाठी रस्त्यावर खड्डे खणल्यास १५,००० रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने रद्द केला आहे. या निर्णयामुळे सार्वजनिक गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे.

एकनाथ शिंदे (eknath shinde)मुख्यमंत्री असताना २०२४ मध्ये झालेल्या गणेशोत्सव नियोजन बैठकीतच (Ganeshotsav planning meeting ch) मंडपासाठी खड्डे खणणाऱ्या मंडळांकडून शुल्क न आकारण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते. मात्र, यंदा महापालिकेने १५,००० दंडाचे पत्रक काढले होते. या दंडाला बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने (Ganeshotsav Samanvay Samiti.)तीव्र विरोध केला.

या विरोधाची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना त्वरित आदेश देत हा दंड रद्द करण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे सार्वजनिक गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे. समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर (Advocate Naresh Dahibavkar)यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार मानले.

Share:

More Posts