Home / Uncategorized / दुर्मिळ खनिजक्षेत्रातील चीनच्या एकाधिकाराला ऑस्ट्रेलियाचे आव्हान

दुर्मिळ खनिजक्षेत्रातील चीनच्या एकाधिकाराला ऑस्ट्रेलियाचे आव्हान

Rare Minerals Sector


पर्थ– इलेक्ट्रिक वाहने (electric vehicles), सौर ऊर्जा या वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रातील दुर्मिळ खनिजांच्या (rare minerals)पुरवठ्यात चीनची (China) एकाधिकार शाही आहे. चीनमधून या खनिजाचा सर्वाधिक पुरवठा होत असतो. त्याला आव्हान देण्याची तयारी ऑस्ट्रेलियाने (Australia)सुरु केली आहे. पर्थपासून काही किलोमीटर दूर असलेलया इनेएबा च्या डोंगरांवर या दुर्मिळ खनिजाचा साठा सापडला असून त्याच्या शुद्धीकरणासाठी अब्जावधी डॉलरचा करार करण्यात आला आहे.


ऑस्ट्रेलियाच्या पर्थजवळ (Near Perth) कोट्यावधी टन स्टॉकपिले या खनिजाचा शोध लागला आहे. हे खनिज इलेक्ट्रिक वाहने, पवनचक्कीचे टर्बाईन व संरक्षण उपकरणांध्ये वापरले जाते. या खनिजाच्या शुद्धीकरणासाठी ऑस्ट्रेलियन सरकारने इलुका कंपनीकडून १.६५ अब्ज डॉलरचे कर्ज घेतले आहे. या पैशातून ही रिफायनरी उभारण्यात येणार असून त्याद्वारे इलुका कंपनीचे दुर्मिळ खनिजाचे उत्पादन ५० ते १७० टक्क्यांनी वाढेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या शुद्धीकरणामुळे २०३० पर्यंत पश्चिमेकडील खनिजाची मागणी पूर्ण करता येईल. त्यामुळे या खनिजाबाबतची चीनवरचे अवलंबित्व कमी होईल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाने व्यक्त केला आहे.