एलन मस्क यांच्या पक्षाची ट्रम्प यांच्याकडून खिल्ली

Elon Musk’s party mocked by Trump

Elon Musk’s party mocked by Trump


वॉशिंग्टन – अमेरिकेतील टेस्लाचे प्रमुख व उद्योगपती एलन मस्क यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्या बरोबर वाद झाल्यानंतर आपला स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे. या पक्षाची ट्रम्प यांनी खिल्ली उडवली आहे.(Elon Musk party news)
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, एलन मस्क हे पूर्णपण रुळावरुन घसरले आहेत. त्यांची अवस्था नियंत्रणाबाहेर गेलेल्या रेल्वेसारखी झाली आहे. तिसरा राजकीय पक्ष काढणे अमेरिकेत कधीही यशस्वी झालेले नाही. अमेरिकन व्यवस्था अशा पक्षांसाठी नाही. तिसऱ्या पक्षांचे काम हे केवळ (US politics Elon Musk)अराजकता पसरवण्याचे आहे. आपल्या कडे आधीच डाव्या लोकशाहीवादी लोकांकडून पुरेशी अराजकता पसरवली जात आहे. त्यामुळे हा प्रयत्न यशस्वी होणार नाही.(Trump mocks Elon Musk)
एलन मस्क यांनी शनिवारी अमेरिकेत एका नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली असून त्याचे नाव अमेरिका पार्टी असे ठेवले आहे. पक्षाची घोषणा करताना एलन मस्क यांनी म्हटले होते की, तुमच्यापैकी ६६ टक्के लोकांना नवा पक्ष हवा होता. (US political news 2025)अमेरिकेला उद्धवस्त करण्यात व भ्रष्टाचाराच्या बाबतीत दोन्ही पक्ष सारखेच आहेत. माझ्या नव्या पक्षामुळे अमेरिकेला द्विपक्षीय व्यवस्थेपासून मुक्ती मिळेल. त्याआधी त्यांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी एक्सवरुन एक ऑनलाईन सर्वेक्षण केले होते. त्यात ६५.४ लोकांनी तिसऱ्या पक्षासाठी मतदान केले होते.