छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल (Former Chhattisgarh chief minister Bhupesh Baghel) यांचे पुत्र चैतन्य बघेल यांना सक्तवसुली संचलनालयाने (Enforcement Directorate)आज मद्य घोटाळा प्रकरणी अटक केली. ईडीने बघेल कुटुंबाच्या दुर्ग जिल्ह्यातील भिलाईयेथील निवासस्थानी छापेमारी केली होती. त्यानंतर काही तासांनी चैतन्य ( Chaitanya Baghel )यांना अटक केली.
छापेमारीच्या वेळी बघेल कुटुंबाच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काँग्रेस कार्यकर्त्यांनी घराबाहेर जमून निदर्शने केली. भूपेश बघेल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, ईडीने आमच्या भिलाई येथील निवासस्थानी छापेमारी केली आहे. आज विधानसभेच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. तमनारमध्ये अदानींसाठी तोडल्या जाणाऱ्या झाडांचा मुद्दा आज उपस्थित होणार होता. गेल्या वेळी माझ्या वाढदिवशी ईडी पाठवण्यात आली होती. यावेळी माझ्या मुलाच्या वाढदिवशी मोदी-शहा यांनी त्यांच्या मालकाला खूश करण्यासाठी ईडी पाठवली आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक (money laundering)कायदा अंतर्गत या प्रकरणाचा सुरू आहे. छत्तीसगडमधील २,१०० कोटी रुपयांच्या कथित मद्य घोटाळ्यातील (liquor case) या पैशाचा काही भाग चैतन्य बघेल यांच्याकडे पोहोचल्याचा संशय आहे. ईडीच्या हाती नवीन पुरावे लागल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचेसूत्रांनी सांगितले. याआधी देखील मार्च महिन्यात ईडीने चैतन्य बघेल यांच्या निवासस्थानी छापे टाकले होते.
