मुंबई – मानखुर्द महाराष्ट्र नगर परिसरात (Mankhurd’s Maharashtra Nagar)बाल गोविंदा मंडळासाठी दुपारी ३ वाजता पहिल्या मजल्यावर जाऊन दहीहंडी बांधत असताना ३२ वर्षीय जगमोहन शिवकिरण चौधरी (agmohan Shivkiran Chaudhary)याचा खाली पडून मृत्यू झाला. त्याला तातडीने गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते . मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मालाडमधील ओम साई गोविंदा पथक (Om Sai Govinda Pathak) ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव (MNS leader Avinash Jadhav, a)यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात आठ थर लावत असताना सातव्या थरावरून एक गोविंदा खाली पडून गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबईमध्ये विविध ठिकाणी दहीहंडी फोडताना ३० गोविंदा जखमी (30 Govindas were injured)झाले. यातील १५ जणांना उपचार करून घरी पाठवण्यात आले, तर विविध रुग्णालयांमध्ये १५ गोविंदांवर उपचार सुरू आहेत. जखमी गोविंदांपैकी पाच जणांवर केईएम रुग्णालयामध्ये (KEM Hospital)उपचार करण्यात आले. नायर व शीव (Nair and Sion)रुग्णालयामध्ये प्रत्येकी एका गोविंदावर उपचार करण्यात आले. जोगेश्वरीतील ट्रॉमा रुग्णालयामध्ये (Jogeshwari Trauma Hospital)तीन आणि उपनगरातील अन्य रुग्णालयांमध्ये (suburban hospitals) दोन जणांवर उपचार करण्यात आले. त्याचप्रमाणे जी.टी. रुग्णालय व सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये प्रत्येकी एका गोविंदावर उपचार करण्यात आले. या दोन्ही गोविंदांच्या डोक्याला मार लागला होता.