मुंबई – सोशल मीडियावर (social media)आणि बॉक्स ऑफिसवर गाजत (box office success)असलेला सैयारा (Saiyyara) हा हिंदी चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. मात्र, या चित्रपटाच्या बरोबरीने प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. त्यातच सैयाराला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे थिएटर मालकांनी मराठी चित्रपटांच्या (Marathi films) स्क्रीनची संख्या कमी केली. त्यामुळे या थिएटर मालकांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांची निर्मित्ती असलेलया येरे येरे पैसा ३ (Ye Re Ye Re Paisa 3)या मराठी चित्रपटाचे शो कमी करण्यात आले आहेत. यामागे केवळ सुडाचे राजकारण असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे (MNS leader Sandeep Deshpande)यांनी केला आहे. मनसेतर्फे त्यांनी सिनेमा थिएटर मालकांना इशारा दिला आहे की, मराठी सिनेमांना स्क्रीन द्या, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने ताळ्यावर आणू. ‘येरे येरे पैसा ३’ या चित्रपटाऐवजी यशराज फिल्म्सच्या सैय्यारा चित्रपटाला स्क्रीन दिल्या जात आहेत. हिंदी सिनेमासाठी मराठी सिनेमाची गळचेपी होत आहे हे दिसून येते. पण, आम्ही आतीच त्यांना सांगतो की, ही गोष्ट आम्ही चालू देणार नाही. अमेय खोपकर यांची निर्मिती असलेल्या सिनेमाबरोबर अशी गोष्ट होणे हे वाईट आहे. मल्टीप्लेक्सवाले (multiplex owners) हे जाणून-बुजून करत आहेत.