राजस्थानात पावसाचा कहर ! ६९ वर्षानंतर विक्रमी पाऊस

heavy rainfall in Rajasthan After 69 Years


जयपूर – राजस्थानात (Rajasthan) जुलै महिन्यात जोरदार पाऊस (heavy rainfall)झाला असून ६९ वर्षांपूर्वीही असाच विक्रमी पाऊस झाल्याचे हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे. राजस्थानात या महिन्यात तब्बल २८५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे.


राजस्थानात या आधी १९५६ (June 1956,) साली जून महिन्यात सर्वाधिक ३०८ मिलीमीटर (308 mm)पाऊस झाला होता. त्यानंतर जुलै महिन्यात सरासरी १६१.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. या वर्षी राजस्थान व उत्तर प्रदेशच्या वर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे जयपूर (Jaipur), शेखावाटी, विकानेर सह अजमेर, कोटा, भरतपूर, चुरु, तारानगर (Taranagar) आदी भागात जोरदार पाऊस झाला. धौलपूर, सीकर व रामगढ मध्येही सरासरी १५० मिलीमीटर पाऊस (rainfallz) झाला. या पावसामुळे राजस्थानातील नद्यानाल्यांना पूर आले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

पावसाने शहरांमधील जनजीवनही विस्कळीत झाले. विविध शहरांना जोडणारे व ग्रामीण भागातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूकही ठप्प झाली. उदयपूर, भरतपूर, सवाई माधोपूर, टोंक जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसामुळे पाणी भरले. धौलपूरमध्ये चंबळ नदी धोक्याच्या पातळीच्या १२ मीटर उंचीवरुन वाहात होती. त्यानंतर अनेक गावांमध्ये पाणी भरल्याने बचावासाठी लष्कराला पाचारण करावे लागले. झुंझुनूं बायपासवर (Jhunjhunu bypass)एक रस्ता धसल्यामुळे ग्रामस्थांनी कामाच्या दर्जाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. केकडी भागातील देवगाव मार्गावर दलदल निर्माण झाली असून त्यात अनेक वाहने अडकली. राजस्थानातील काही भागात २ तर काही भागात ६ ऑगस्टपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा (warnings) हवामान विभागाने दिला आहे.