Home / Uncategorized / Arun Gawli : नगरसेवक जामसंडेकर हत्या प्रकरण ! अरुण गवळीला सुप्रीम कोर्टात जामीन

Arun Gawli : नगरसेवक जामसंडेकर हत्या प्रकरण ! अरुण गवळीला सुप्रीम कोर्टात जामीन

Arun Gawli

Arun Gawli – शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर (Kamlakar Jamsandekar )यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. दीर्घ काळापासून गवळी जामिनासाठी अर्ज करत होता, परंतु त्याचे अर्ज वारंवार फेटाळले जात होते. अखेर आज सर्वोच्च न्यायालयात त्याला दिलासा मिळाला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच गवळीला हा जामीन मिळाला आहे.

गवळीच्या दीर्घ कारावासाचा कालावधी आणि त्याचे वय लक्षात घेऊन हा निर्णय देण्यात आला. अरुण गवळी १७ वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात आहे आणि त्याचे वय आता ७६ वर्षांपेक्षा अधिक आहे, असे न्यायमूर्ती एम. सुंदरेश (Justices M. Sundresh) आणि एन. कोटिश्वर सिंह (N. Kotiswar Singh)यांच्या पीठाने नमूद केले. कनिष्ठ न्यायालयाने लादलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहूनच हा जामीन मंजूर (granting bail.)करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाची अंतिम सुनावणी फेब्रुवारी २०२६ मध्ये ठेवण्यात आली आहे.

घाटकोपर (Ghatkopar) येथे २ मार्च २००६ रोजी संध्याकाळच्या सुमारास ही हत्या झाली होती. नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हे आपल्या घरात टीव्ही पाहत असताना अज्ञात गुंडांनी घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला होता. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या हत्याकांडाने त्यावेळी संपूर्ण मुंबई हादरली होती. त्यानंतर २०१२ मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court)त्याला जन्मठेपेची शिक्षा आणि १७ लाख रुपयांचा दंड ठोठावला. उच्च न्यायालयानेही हा निकाल कायम ठेवला, त्यानंतर गवळीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

पंतप्रधान मोदी उद्यापासून चीन व जपानच्या दौऱ्यावर

15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणारे बेस्ट लॅपटॉप ; वाचा फीचर्स आणि किंमत

आसाराम बापूचा अंतरिम जामीन मुदतवाढीस हायकोर्टाचा नकार!