Santosh Deshmukh murder case : वाल्मिक कराड दोषमुक्तीसाठी उच्च न्यायालयात अर्ज करणार ?

santosh deshmukh murder suspect walmik Karad

बीड – बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh)हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा दोषमुक्ती अर्ज बीड विशेष मोक्का न्यायालयाने (Beed Special MCOCA Court)फेटाळल्याने कराड आता वकिलांच्या मार्फत उच्च न्यायालयात धाव घेणार आहे. दोष मुक्तीच्या अर्ज (petition)संदर्भात आणि दोषारोप (chargesheet) पत्रासंदर्भात उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली जाणार आहे.

वाल्मिक कराडने आपण निर्दोष असल्याचा दावा करत दोषमुक्तीचा अर्ज विशेष न्यायालयात सादर केला होता. पण विशेष मोक्का न्यायालयाने तो फेटाळून लावताना निरीक्षणात म्हटले की,वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार आहे. तो गुन्हेगारी टोळीचा सदस्य (criminal gang)आहे. मृत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात तो सहभागी होता.या टोळीवर २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. मागच्या दहा वर्षांत गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत तर बीड जिल्हा न्यायालयात ११ प्रलंबित फौजदारी खटले (11 criminal cases) आहेत. कराडच्या विरोधामध्ये सबळ पुरावे (strong evidence) असल्यामुळे त्याचा जमीन फेटाळण्यात येत आहे.